घुसखोरीचा डाव उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान   

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलाने बुधवारी घुसखोरीचा डाव उधळून लावला. तसेच, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी नाला येथे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचे लष्कराने सांगितले. दोन ते तीन दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी इशारा दिला. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यास सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
 
दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली. अद्याप शोधमोहीम सुरू आहे, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यास २४ तासांचा कालावधी होत नाही, तोच दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी त्यांचा हा डाव उधळून लावला.
 

Related Articles